निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्रातील जनतेचे कुस्तीवर मनापासून प्रेम आहे. मुलांमध्ये क्रीडानैप्युण्य वाढीस लागावे म्हणून वस्ताद परिश्रम घेतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद या मल्लांना मासिक मानधनाची योजना सुरु केली. महाराष्ट्र ऑलिंम्पिकचा अध्यक्ष या नात्याने देखील मी महाराष्ट्राच्या कुस्तीचा जगभर नाव लौकिक वाढावा म्हणून काम करीत आहे. असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे सौदागर येथे केले.
एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र केसरी गट (86 ते 125 किलो) गादी विभागात खुल्या गटात रहाटणीच्या पै. किशोर नखाते याने भोसरीतील हर्षवर्धन माने वर 12 विरुध्द 2 असा भारंदाज डावावर तांत्रिक गुणांनी विजय मिळविला. महाराष्ट्र केसरी गट (86 ते 125 किलो) माती विभागात खुल्या गटात रहाटणीच्या पै. वैभव तुपे याने पिंपळे सौदागरच्या पै. कानिफनाथ काटे ला बांगडी डावावर चितपट करुन विजय मिळविला. गादी विभागातून निवड झालेला पै. किशोर नखाते हा चालू वर्षीचा महाराष्ट्र युवा केसरी असून पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे सराव करीत आहे. माती विभागातून निवड झालेला पै. वैभव तुपे हा एचए तालीम येथे सराव करीत आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 61 वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. 20 ते दि. 24 डिसेंबर 2017 ला भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलिस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत रविवारी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. पै. किशोर नखाते विरुध्द पै. हर्षवर्धन माने यांची गादी विभागातील महाराष्ट्र केसरी खुला गटातील अंतिम सामना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावण्यात आला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, संयोजक व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, संघाचे उपाध्यक्ष काळूराम कवीतके, दिलीप बालवडकर, पोपट फुगे, पंडित मोकाशी, राजू जाधव, हिंद केसरी अमोल बराटे, पंच धोंडीबा लांडगे, मारुती सातव, नवनाथ ढमाळ, मनोज दगडे, विजय कुटे, विजय नखाते, निवेदक हंगेश्वर धायगुडे, रहाटणी पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, प्रभाकर वाघेरे, मच्छिंद्र तापकीर, कैलास थोपटे, हरीभाऊ तिकोणे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सहाय्यक पौलिस आयुक्त राम मांडुरके, अमरसिंग आदियाल, हर्षल ढोरे, राजू जगताप, शाम जगताप, सुरेश चोंधे, तुषार कामठे, माऊली सुर्यवंशी, विलास पाडाळे, रविकांत वरपे, मनोहर पवार, शाम काळे, तानाजी भोंडवे, देवा नखाते, दिलीप वाल्हेकर, नरेश खुळे, अभिषेक बारणे, नितीन हिंगवले, दिलीप काळे, राहूल जवळकर, शेखर काटे, गोरक्षनाथ पाषाणकर, नवनाथ नडे, लाला चिंचवडे, विशाल पवार, भूलेश्वर नांदगुडे, रमेश नखाते, हलकी वादक बापू आवळे, रंगत आवळे आदी कुस्ती शौकिन उपस्थित होते.