निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळेसौदागर येथे उभारण्यात येत असलेल्या उद्यानाला राजमाता जिजाऊ उद्यान असे नाव देण्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी “ड” क्षेत्रीय कार्यालयाचे सभापती शशिकांत कदम यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक काटे दाम्पत्याने सभापती शशिकांत कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपळेसौदागर येथील शिवार रोडवरील रोझलँड रेसिडेन्शी सोसायटी शेजारील सर्व्हे क्रमांक १३०, १३२, १३३ आणि १३४ मधील आरक्षण क्रमांक ३७१ ब मध्ये दोन हेक्टर जागेत प्रशस्त उद्यान उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळेसौदागरमधील हे सर्वात मोठे व सर्व सोयींनीयुक्त असे हे उद्यान असणार आहे.
या उद्यानात वैशिष्ट्यपूर्ण कारंजे, लहान मुलांसाठी खेळायचे हिरवळ युक्त मैदान, जॉगिंग ट्रॅक, हास्य क्लब परिसर, मिनी ट्रेन, ध्यानधारणा करण्यासाठी स्वतंत्र व प्रशस्त जागा, रंगी बेरंगी छोटे रोपटे, हस्तकला दालन, बोटिंग सहल केंद्र अशा अनेक सोयीसुविधा असणार आहेत. या उद्यानामुळे पिंपळेसौदागरच्या शिरपेचात आणखी एक भर पडणार आहे. या उद्यानाला राजमाता जिजाऊ उद्यान असे नाव देण्यात यावे. त्यामुळे या उद्यानाचाही उचित गौरव होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.