निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र शासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे फिल्म फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे महापौर नितीन काळजे व महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) उद्घाटन करण्यात आले.
चिंचवड येथील बिग बझार सिनेमागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपमहापौर शैजला मोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, सह आयुक्त दिलीप गावडे, संजय कांबळे, सतीश इंगळे, महोत्सवाचे समर नखाते, विशाल शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देश-विदेशातील विविध भाषांतील एकूण ४६ चित्रपट दाखविले जाणार आहेत.
सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. आभार सतीश इंगळे यांनी मानले.
चित्रपट महोत्सवाचे मुख्य उदघाटक अभिनेते ऋषी कपूर कौटुंबिक कारणास्तव अनुपस्थित, पिंपरी चिंचवड शहरातील खासदार, आमदार, पक्षनेते, स्थायी समितीच्या अध्यक्षा यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली त्यामुळे रसिकांमध्ये नाराजी दिसून आली.