28 हजार रुग्णांची मोफत तपासणी!
निर्भीडसत्ता न्यूज –
प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान, राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमानेपिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब रुग्णांसाठी सांगवी येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबीराला भरभरून प्रतिसाद मिळाला. या शिबीरात तब्बल २८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. तसेच तीन हजारहून अधिक मुला-मुलींचे समुपदेशन करण्यात आले. ३३ अपंगांना जयपूरफूट व कॅलीपर्सचे, १५ अपंगांना व्हिलचेअरचे, ७८ जणांना श्रवणयंत्रांचे आणि साडेपाच हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
दरम्यान, या शिबीरामार्फत मोफततपासणी व उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील जनतेने भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले.
महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक शीतल शिंदे, हर्षल ढोरे, सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून गुरूवारी आणि शुक्रवारी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर हे मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या दोन्ही दिवशीशिबीराच्या ठिकाणी सकाळपासूनच गरजू रूग्णांनी तपासणीसाठी रांगा लावल्या होत्या. शिबीरासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नामांकित रुग्णालय, तेथील तज्ज्ञडॉक्टर्सना आमंत्रित करण्यात आले होते. या तज्ज्ञ डॉक्टरांनी लहान बालकांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर मोफत उपचारकेले. तसेच आवश्यकता भासलेल्या रुग्णांवर संबंधित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या शिबीरात रुग्णांसाठी जेवण, चहा व पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुग्णांच्या तपासणीसाठी एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, रक्तासंदर्भातील सर्व चाचण्या करण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेसाठी डॉक्टरांची स्वतंत्र टिम ठेवण्यातआली होती. उपचारासोबतच मोफत औषधांचे स्टॉलही लावण्यात आले होते. स्त्रियांचे आजार व कर्करोग यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अपंगासाठीपार्किंगजवळच ओपीडी, स्ट्रेचर व औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या शिबीरात रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अॅन्जिओग्राफी, मर्यादित अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, चष्मे व श्रवणयंत्रांचे मोफत वाटप, ह्दयरोग तपासणी व शस्त्रक्रिया, दंतरोग, नेत्ररोग, त्वचा विकार, हाडांचे आणि मणक्यांचे आजार, श्रवणदोष, प्लास्टिक सर्जरी, आयुष, किडनी व मुत्रमार्गाचे विकार, फीट्स, कान-नाक-घसा, गरोदर माता तपासणी, मेंदुची शस्त्रक्रिया, रक्तदाब व मधुमेह, स्त्रीरोग तपासणी, फाटलेले ओठ व टाळुवरील शस्त्रक्रिया, बालरोग व शस्त्रक्रिया,स्वाईन फ्लू लस (डायबिटीस, उच्च रक्तदाब व गरोदर महिलांसाठी), किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, दोन दिवस चाललेल्या या मोफत महाआरोग्य शिबीरात २८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच तीन हजारहून अधिकमुला-मुलींचे समुपदेशन करण्यात आले. ३३ अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे, १५ अपंगांना व्हिलचेअरचे, ७८ जणांना श्रवणयंत्रांचे, तर साडेपाच हजार चष्म्यांचे मोफतवाटप करण्यात आले. पैसेअभावी अनेकांच्या आजारावर उपचार होत नाही. अशा उपेक्षित लोकांच्या उपचाराची जबाबदारी या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातूनघेण्यात आली. शिबीर संपल्यानंतरही ही सुविधा नागरिकांना दिली जाणार आहे. भविष्यात जे रुग्ण असतील, त्यांना फक्त आमच्यापर्यंत पाठवा, त्यांची उपचाराची पुढीलजबाबदारी आम्ही घेऊ. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी हे महाआरोग्य शिबीर घेण्यात आल्याचेत्यांनी सांगितले.