निर्भीडसत्ता न्यूज –
चिखलीतील घरकुल प्रकल्प व परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडत आहेत. या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक पळसुले यांच्या समवेत या भागाची पाहणी केली.
पोलीस उपायुक्त शिंदे व पोलीस अधिका-यांपुढे परिसरातील नागरिकांनी समस्या मांडल्या. तसेच, गुन्हेगारीला आवर घालण्याची विनंती करण्यात आली. दरम्या, घरकुल व परिसरात लवकरात लवकर पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी एकनाथ पवार यांनी मागणी केली. त्याबाबत लवकरच पोलिस चौकी उभारण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले आहे.