निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील अनधिकृत फलक, होर्डिंग्ज आणि जाहिरातींबाबत वारंवार महापालिका आयुक्तांसह व संबधित अधिका-यांकडे तक्रारी केल्या. मात्र. महापालिका प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करीत नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आंदोलक पवित्रा घेतला. त्यांनी प्रभागातील ४०० अनधिकृत फलक काढून पालिकेच्या प्रवेशव्दारावर टाकून प्रशासनाचा निषेध केला आहे.
नगरसेवक तुषार कामठे म्हणाले की, मागील काही महिने सतत ड प्रभाग अधिकारी, आकाश परवाना विभागाचे सहायक आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार केला. या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पालिकेने कारवाई केली नाही. यंत्रणा असूनही पालिकेचे कारवाईसाठी हात धजावत नाही. त्यामुळी ही भुमिका घ्यावी लागली.