निर्भीडसत्ता न्यूज –
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलासाठी दोन रॅम्प एम्पायर सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. त्या रॅम्पला एम्पायर इस्टेट सोसायटीतील दहा हजार रहिवाशांनी विरोध दर्शविला होता. परंतू, रहिवाशांचा विरोध डावलून स्थायी समितीने त्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या सभेत मान्यता दिली.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. दरम्यान, या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी देवू नये, तो प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी केल्याचे सांगितले. मात्र, त्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने सुमारे 12 कोटी 69 लाख 41 हजार 281 रुपयांचा खर्चाला स्थायीने मान्यता दिली. त्यामुळे रॅम्प होवू नये, याकरिता एम्पायर इस्टेटमधील रहिवाशी व व्यापा-यांना घेवून महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका बीआरटीएस विभागाच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावर एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. उड्डाणपुलावरून वाहनांना खाली येण्यास आणि उड्डाणपुलावरती चढण्यास दोन रॅम्प बांधण्यात येणार आहे. या रॅम्पसाठी बीआरटीएस विभागाकडून राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी मे.टी ऍन्ड टी इन्फ्रा. प्रा. लि. या ठेकेदाराला दिले आहे. याकरिता प्रत्यक्ष कामावर 12 कोटी 25 लाख 61 हजार 375 रुपये आणि सेवावाहिन्या स्थलांतरीत करण्यास 43 लाख 79 हजार 906 रुपये असा एकूण 12 कोटी 69 लाख 41 हजार 281 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिल्याने दोन्हीही रॅम्पचे काम सुरू होणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या चिंचवड येथील उड्डाणपुलावरुन रॅम्प करण्यास एम्पायर इस्टेट सोसायटीतील सुमारे दहा हजार रहिवाशांनी विरोध केला होता. याबाबत एम्पायर इस्टेट सोसायटीच्या दोन्ही बाजुंनी हे दोन रॅम्प येणार आहेत, त्यामुळे तेथील रहिवाशांना त्यांचा त्रास होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते. तसेच बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यासमवेत बैठक घेवून त्यांचा अडचणी मांडल्या होत्या. तरीही महापालिकेच्या अधिका-यांनी रॅम्प करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांनी रॅम्पला विरोध दर्शवून कसल्याही परिस्थितीत रॅम्प उतरवू देणार नाही, त्याला आमचा विरोधच राहणार अशी भूमिका रहिवाशी व व्यापा-यांनी घेतली आहे.
—————————— ————————————————
स्थानिक नगरसेवक व रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात
चिंचवड येथे एम्पायर इस्टेट सोसायटीसमोर दोन रॅम्प करण्यात येवू नयेत, उड्डाणपुलावरुन खाली येण्यास 500 मीटर अंतरावर सोय आहे. तरीही सोसायटीसमोर रॅम्प उभारण्यास महापालिका अधिकारी ठाम आहेत. स्थायी समितीने हा विषय स्थगित न ठेवता त्याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे एम्पायर इस्टेट सोसायटीतील दहा हजार रहिवाशी घेवून महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी दिला आहे.
——————————
स्थानिक नगरसेवक व रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात
चिंचवड येथे एम्पायर इस्टेट सोसायटीसमोर दोन रॅम्प करण्यात येवू नयेत, उड्डाणपुलावरुन खाली येण्यास 500 मीटर अंतरावर सोय आहे. तरीही सोसायटीसमोर रॅम्प उभारण्यास महापालिका अधिकारी ठाम आहेत. स्थायी समितीने हा विषय स्थगित न ठेवता त्याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे एम्पायर इस्टेट सोसायटीतील दहा हजार रहिवाशी घेवून महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी दिला आहे.