निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शुक्रवारी (दि. ९) च-होलीतील १३ बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
च-होलीतील गंधर्व पार्क, सिध्दीविनायक पार्कमधील एकूण १३ हजार ९४७ चौरस फुटांच्या १३ बांधकामांवर कारवाई करून भुईसपाट करण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, उपअभियंता एस. आर. चौरे, कनिष्ठ अभियंता डी. व्ही. तापकीर यांनी २६ पोलीस अधिकारी, कर्मचारी, १० मजूर, २ जेसीबी, १ डंपरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. पिंपळे गुरव, सांगवी, काळेवाडी, रहाटणीनंतर भोसरी परिसरातील च-होली, मोशीमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.