निर्भीडसत्ता न्यूज –
काम शिकविण्याच्या बहाण्याने सहकारी महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी बजाज ऑटो कंपनीतील प्रशासन विभाग प्रमुखाला अटक करण्यात आली. ही घटना चाकण एमआयडीसीत घडल्याचे समोर आले आहे.
अनिल विष्णु गुडेकर असे अटक करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. या प्रकरणी भोसरीतील पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला कार्यालयात एकटी असताना, काम शिकविण्याच्या बहाण्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे गुडेकर वर्तन करत असायचा. या प्रकाराकडे या महिलेने दुर्लक्ष केले. मात्र दिवसेंदिवस गुडेकर याचा त्रास वाढतच गेला. गेली चार महिने हा प्रकार सुरु होता. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या महिला सुरक्षा अधिकारी व इतर वरिष्ठ अधिका-यांच्या कानावर हा प्रकार घातला. नंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून या महिलेने चाकण ठाण्यात फिर्याद दिली.