निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने फ्लोरेन्स इटाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी अपंग जलतरणपटू कॅमिला पटनायक हिचा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आदी या वेळी उपस्थित होते.