पिंपरी, 15 फेब्रुवारी- पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने शॉर्ट टर्म कोर्सेस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (गुरूवारी ) सकाळी सिम्बॉयसिस कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलपती स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचीर्य डॉ. अशोक भोईटे, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष विशाल मासुळकर उपस्थित होते.
प्रदर्शनात जर्नालिझम, फँशन डिझाईन, व्यक्तिमत्व विकास, फोटोग्राफी, फ्रेंन्च लँगवेझ, ट्रव्हल अँन्ड टुरिझम, कौशल विकास, जिओग्रॉफी, डीटीपी, भोगोलिक माहिती प्रणाली, स्पोकन इंग्लिश, ब्युटी पार्लर, सेल्फ एम्प्लॉयमेंट, इन्शुरन्स यासह विविध 36 स्टॉल प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मांडले होते. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर व्यावसायिक, रोजगार पुरक आणि कौशल्य विकासावर आधारीत कोर्सेस महाविद्यालयाकडून चालविले जातात. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.