निर्भीड न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘स्थायी समिती’चे सभापती हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी हे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला सदस्यांचे विषय समजून घेत नाहीत. व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. आपलाच मनमानी कारभार स्थायीत सुरु ठेवला आहे. स्थायी समितीचा रिमोट भाजप आमदारांच्या हातात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या सदस्या, नगरसेविका अनिता तापकीर स्थायी समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि. २६) पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेचे नगरसेवक संपत पवार यांनी हि सभापती आसवानी हे समिती चालविताना सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्याही राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे हे सभापती राष्ट्रवादी कॉग्रेसचे आहे की भाजपाचे असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेविका अनिता तापकीर यांनी .
काळेवाडी येथील स्मशानभूमीचा विषय दोन आठवडे तहकूब का ठेवला असा प्रश्न हि तापकीर यांनी यावेळी उपस्थित केला मात्र भाजप आमदारांच्या सांगण्यावरून हा विषय मंजूर केला असल्याचा आरोप तापकीर यांनी केला. स्थायी समितीचे सभापती आम्हाला विश्वासात घेत नाहीत. ठराविक सदस्यांना विश्वासात घेऊनच हा मनमानी कारभार सुरु आहे असेही तापकीर यांनी यावेळी म्हणाल्या.
स्थायी समितीच्या अन्य सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक देत आहे. स्थायीच्या सभेत कोणत्याच विषयावर चर्चा करून देत नाही. त्यांची ही भूमिका पक्षाविरोधी आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचे अनिता तापकीर यांनी सांगितले.