निर्भीड न्यूज
जाणीव फाउंडेशनच्या वतीने पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित केलेल्या ‘सर्व जाती धर्माच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात’ एकुण 15 जोडपे विवाहबध्द झाली.
आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, भारतीय मायनॉरीटीज सुरक्षा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मारूती कदम, देशभक्त क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम, फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, हिंद मजुर किसान पंचायतचे पुणे जिल्हा सरचिटणीस भीमरावजी रनधिर, नगरसेविका निता पाडाळे, शिवसेना विभाग प्रमुख हरेश नखाते, राकेश नखाते, माजी नगरसेविका मीना नाणेकर, संदिप वाघेरे, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख सुशिला पवार, काशिनाथ नखाते, शिवसेना ग्राहक कक्षाचे उपशहराध्यक्ष बाबासाहेब जगताप, एकनाथ मंजाळ, पुनम कापसे, रजनी बागुल, उदय वाघेरे, महेश भागवत आदी यावेळी उपस्थित होते.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. फाउंडेशनने सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून दुष्काळगृस्त भागातील व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. नवदाम्पत्यास संसारोपयोगी वस्तू , भेट वस्तू व सौर दिवे देण्यात आले. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या पाहुण्याच्या जेवणाची सुविधा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.