निर्भीडसत्ता न्यूज –
त्यागमूर्ती महामता रमाई आंबेडकर यांच्या भारतातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पुण्यातील वाडिया कॉलेजसमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी विचारमंचावर महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ चे विद्यसागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री ना प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे; महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एखादया उंच इमारतीला उभे राहण्यासाठी तिचा पाया अधिक मजबूत असावा लागतो तसेच माता रमाई आंबेडकर या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक उंचीच्या कर्तृत्वाच्या पाया झाल्या आहेत.त्यांच्या त्यागाला कर्तुत्वाला समस्त भारत देशवासीयांच्या वतीने वंदन करतो असे विचार राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.