निर्भीडसत्ता न्यूज –
मॉस्को – फिफा विश्वचषकात उरुग्वेने सौदी अरेबियाचा 1-0 ने पराभव केला आहे. लुईस सुआरेझने आपल्या शंभराव्या सामन्यात केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने फुटबॉल विश्वचषकात 1954 सालानंतर पहिल्यांदाच सलग दोन विजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. सुआरेझने सामन्याच्या 23 व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल केला. कॉर्नरवरुन सांचेझने किक केलेला बॉलला सुआरेझने योग्य दिशा देत गोल पोस्टच्या दिशेने रवाना केला आणि संघाला 1-0ने आघाडी मिळवून दिली.