निर्भीडसत्ता न्यूज –
गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासूनच दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. अमरावतीत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी दूधाचा टँकर पेटवण्याचा प्रयत्न केला.