निर्भीडसत्ता न्यूज –
जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महानगरपालिका आयोजित शालेय जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय विजयी झाले. अंतिम सामन्यात त्यांनी एंजेल मिकी हायस्कुल संघाचा ९ गडी राखून पराभव केला . ३० सप्टेंबर रोजी हा अंतिम सामना आझम कॅम्पस मैदानावर झाला .
विजयी संघाचे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,तसेच आझम स्पोर्ट्स एकेडमी चे संचालक गुलझार शेख ,महाविद्यालयाचे उप प्राचार्य गफार शेख यांनी अभिनंदन केले .