निर्भीडसत्ता न्यूज –
फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीतर्फे आयोजित एफसीटी 20 क्रिकेट स्पर्धेत एचएमएके स्पोर्टस मॅनेजमेंट संघाने इलेव्हन वॉरिअर संघाचा 122 धावांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. एच. दिव्यांगने 46 चेंडूत 107 धावांसह शतक झळकविले.
कासारसाई येथील क्रॅसालीस मैदानात स्पर्धा सुरू आहे. एमएमएके संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडी बाद 231 धावांचा डोंगर रचला.दिव्यांगने तडाखेबाज फलंदाजी करीत शानदार 107 धाव केल्या. एचएमएकेच्या 231 धावांचा पाठलाग करताना इलेव्हन वॉरिअर संघाचा डाव सर्व गडी बाद 119 धावात आटोपला गेला. दिव्यांग सामन्याचा मानकरी ठरला.
दुसर्या लढतीत एसएसजीने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.एचएमएकेच्या भेदक गोलंदाजी समोर एसएसजीने कात टाकत 20 षटकात सर्व गडी बाद केवळ 68 धावा केल्या.
एचएमएकेने अवघ्या 6 षटकात एका गडीच्या मोबदल्यात 72 धावा करीत 9 गडी राखून विजय मिळविला. एचएमएकेच्या सचिन तावरे याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हा विजय मिळवला. तीन षटकात 16 धावाच्या मोबदल्यात 3 गडी बाद करणार्या तावरे हा सामन्याचा मानकरी ठरला. फल्लाह अॅकॅडमीचे सय्यद फल्लाह यांच्या हस्ते सामनावीर दिव्यांग व तावरे यांना बक्षीस प्रदान करण्यात आले.