पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका सतरा वर्षीय तरुणीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नुकतीच चाकण परिसरात घडली. तिचा मृतदेह हा विवस्त्र आढळल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
प्रविण दरेकर म्हणाले, चाकण परिसरातील १७ वर्षीय तरुणीचा खून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सामान्य नागरिकांना निर्भीडपणे जगता आलं पाहिजे. म्हणून, आज अपर पोलीस आयुक्तांची भेट घेतली यातून पीडित तरुणीला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. राज्यात कायद्याचा धाक कमी झालेला दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, त्यामुळे अशा क्रूर घटना घडत आहेत. तरुणीसोबत अघटित असं काही घडलेलं नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरुणीच्या अंगावर व्रण आहेत त्यामुळे पोलीस चांगल्या पद्धतींने तपास करतील.
आमदार महेश लांडगे, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,जिल्हापरिषद सदस्य शरद बुट्टे पाटील,अतुल देषमुख यांच्यासमवेत भेट दिली.तसेच कलवडे यांच्या घरी जाऊन मा.दरेकर व बाळाभाऊ भेगडे यांनी कुटुबियांचे सांत्वन केले. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाइकांनी केली. कायद्यापुढे कोणी मोठे नाही असा संदेश पोलिसांच्या कारवाईतून जावा अशी अपेक्षा देखील दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. कायद्याचा धाक कुणालाही राहिला नाही. राज्यात बलात्कार, विनयभंग अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. घटनास्थळी भेटीही दिल्या जात नाही. अस मत बाळा भेगडे यांनी व्यक्त केल.
यावेळी, मा.राज्यमंत्री संजय बाळा भेगडे,आमदार महेश लांडगे, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हापरिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख उपस्थित होते.