पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
अहोरात्र काम करणार्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना कोरोना विषाणूचे संसर्ग होत आहे. आतापर्यंत 50 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचार्यांना 14 दिवसांची विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाची लागण अधिकारी व कर्मचार्यांना होत आहे. आतापर्यंत तब्बल 60 पेक्षा अधिक डॉक्टर, परिचारिका, अभियंता, सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनान चिंतेत पडले आहे. मनुष्यबळ कमी पडत असल्याने पालिका कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनेचे काम करीत असताना कोरोनाची लागण झाल्यास त्या अधिकारी व कर्मचार्यास 14 दिवसांची विशेष रजा देण्याची मागणी पिंपीर-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने 16 जुलैला आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे आयुक्तांनी कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचार्यांना 14 दिवसांची विशेष रजा देण्याचा आदेशाला मंजुरी दिली आहे. ही रजा वैद्यकीय रजा म्हणून मंजुर केली जाणार आहे.