निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उस्मानाबाद येथील एका 32 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
या रुग्ण महिलेला १५ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानतंर तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या वर्षी पिंपरी-चिंचवडमध्ये 23 जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. तर, स्वाईन फ्ल्यूचे आत्तापर्यंत 181 रुग्ण आढळले आहेत. आणखी 31 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.