निर्भीड न्यूज –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार सेलची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारिणी शुक्रवार, दि. 8 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या कार्यकारिणीत अध्यक्षांसह 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) आणि सहकार सेलचे शहराध्यक्ष सुनील कुंजीर यांनी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, राष्ट्रवादी काँगेसचे शहर प्रवक्ते फजल शेख, श्रीधर वाल्हेकर, उत्तम हिरवे आदी या वेळी उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील या वेळी म्हणाले की, सहकार सेलच्या माध्यमातून शहरातील सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यात येतील. राष्ट्रवादी काँगेसच्या विविध सेल आणि आघाड्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सहकार सेलच्या माध्यमातूनही पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सहकार सेलचे शहराध्यक्ष सुनील कुंजीर या वेळी म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात सहकारी तत्वावरील संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. स्वयंरोजगार संस्था, पतसंस्था, बँका, गृहनिर्माण संस्था अशा अनेक संस्थांचा यात समावेश होतो. या संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पार्टीतर्फे सहकार सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला पुरक असे कार्य करण्यात येईल. सहकार क्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
कार्याध्यक्ष – पोपट सर्जेराव माने
कोषाध्यक्ष – सुरेश अनंता गायकवाड
उपाध्यक्ष – काळुराम पोपट कवितके
सुदाम तुकाराम भिलारे
संग्राम बाबुराव चव्हाण
सरचिटणीस – भीमराव दत्तोबा म्हस्के
चिटणीस – ज्ञानेश्वर बाबुराव मुरकुटे
जितेशकुमार शशिकांत मोरे
संजय जगन्नाथ पाटील
संघटक – बाळासाहेब जानबा पाटील
संपर्क प्रमुख – तानाजी बंडा चौगुले
मनीष सुधाकर चक्रनारायण