निर्भीड न्यूज –
स्वामी समर्थ प्रकटदिन रहाटणी येथे उत्साहाज साजरा करण्यात आला. स्वामींची पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रहाटणी गावातील पवनानगर येथील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रभागा आणि भीमाजी लांडगे या दाम्पत्याकडून हा उत्सव दहा वर्षांपासून साजरा केला जात आहे.
प्रकटदिनानिमीत्त स्वामींच्या पालखीची रहाटणी गावात मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी परिसरातील भजनी मंडळ, ग्रामस्थ आणि भक्तगण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर मंदिरात महाआरती झाली. मंदिरातील स्वामींची मूर्ती आणि पालखीचे या वेळी पूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार सेलचे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष सुनील कुंजीर या वेळी उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
विठ्ठल लांडगे, भारत कांबळे, संतोष लांडगे प्रशांत पवार, कुणाल लांडगे, गौतम कांबळे, सुमीत गोटे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.