निर्भीड न्यूज
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस पदी पिंपळे सौदागर येथील हेमंत सिंग यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सिंग हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक,शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.