निर्भीड न्यूज –
गुढी पाडवा आणि मराठवाडा जनविकास संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा आणि अनाथालयास अन्न-धान्याची मदत करण्यात आली.
मराठवाडा जनविकास संघातर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त इतर खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर संघाचे अध्यक्ष अरुण पवार प्रत्येक वर्षी भर देतात. यंदाही त्यांच्या संकल्पनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका येथील जांब, बावी, पन्हाळवाडी, भवानवाडी या चार गावांना टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे; तसेच पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ केंद्रास अन्न-धान्याची मदत करण्यात आली.
वामन भरगांडे, सूर्यकांत कुरुलकर, बालाजी पवार, आशिष जाधव, राहुल चोथवे, विजय पवार, बालाजी पाटील, गणेश नखाते, मनोज ढेपे, दीपक जाधव, सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, दादासाहेब पिंगळे, पांडुरंग रंदवे, संतोष भोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.