निर्भीड न्यूज –
सावधान ! रस्त्यावर उघड्यावर विकल्या जाणार्या बर्फगोळ्यावर धूळ बसते व ते बर्फगोळे मोठ्यांसह, लहान मुले आवडीने खातात; परंतु हे घातक असून, अनेक आजारांना निमंत्रण देणारे आहे; तसेच हा बर्फ दूषित पाण्याने तयार करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. अशा व्यवसायिकांवर संबंधित विगाभाने कारवाई करण्याची गरज आहे.
उन्हाचा तडाखा वाढल्याने थंडपेयांना मागणी वाढली आहे. शीतपेय विक्रेत्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे. सध्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावर अनेकांनी हातगाड्यांवर बर्फ गोळा विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. उन्हाचा पारा चढतच असल्यामुळे जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विद्यार्थी व नागरिकही बर्फ गोळा मोठ्या हौसेने खातात. बर्फ गोळा तयार करताना अनेक प्रकारच्या रंगांसह सॅकरीनचा वापर केला जातो. सॅकरीनचे सेवन शरीराला घातक आहे. हे बर्फ गोळे उघड्यावर विक्री होत असल्याने रस्त्यावरची धूळ या बर्फ गोळ्यावर जाते.
कृत्रिम रंग आणि सॅकरीनचा पाक तयार करताना शुध्द पाणी वापरले जात नाही. त्यामुळे असा बर्फ गोळा खाल्ल्याने विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते.