निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीसाठी गुरुवार (दि.८) शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.