निर्भीडसत्ता न्यूज –
सभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोणातुन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पुढाकाराने लोणावळा येथील कुमार रिर्साट येथे एक दिवसीय शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. १५ जून २०१८ रोजी करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार असुन या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रमुख वक्ते उपस्थित राहणार असुन या शिबिराचा समारोप जलसंपदा मंत्री मा.ना. विजयबापु शिवतारे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.या शिबिरासाठी आमदार मनोहरशेठ भोईर, आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे , रायगड जिल्हा महिला संघटीका रेखा ठाकरे , रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख किशोरी पेंडणेकर इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतिल पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे वक्ते शशांक मोहिते, दिपक शेडे, नितीन बानगुडे पाटील हे प्रमुख वक्ते राहणार आहेत. सकाळच्या सत्रात शशांक मोहिते यांचे वक्ता प्रशिक्षण शिबिर या विषयावर मार्ग दर्शन होणार असुन दुपारच्या सत्रात दिपक शेडे यांचे निवडणुक व बुथ व्यवस्थापन व शिवसेना उप नेते नितीन बानगुडे पाटील यांचे मी भगवा फडकवणाराच या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या शिबिराचा समारोप जलसंपदा मंत्री विजयबापु शिवतारे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.