निर्भीडसत्ता न्यूज –
शहर परीवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देवून नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारपरिषदेत केले.
उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यावेळी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा बदलून शहराची एक विशेष ओळख निर्माण करणे. जगासाठी एक शहर म्हणून केवळ काम करणे नव्हे तर जग ओळखेल असे शहर तयार करणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे एक नवीन उद्दिष्ट आहे. सिटी ट्रान्सफॉर्मेशनचे उद्दिष्ट साधण्याकरिता सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस कार्यान्वित करण्याचे उद्दीष्ट असून, जानेवारी महिन्यात संपूर्णपणे कार्यात्मक सिटी परिवर्तन कार्यालय (सीटीओ) ची स्थापना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नियुक्त करण्यात आली आहे.
शहरासाठी सर्वसमावेशक विकास याकरिता नागरिक सहभागाचे सर्वेक्षण केले जात आहे.
सर्वसमावेशक शहराचे ध्येयधोरण: जगातील व भारतातील सर्वोत्कृष्ट शहरांसोबत तुलना करुन शहरातील संस्था व नागरीकांसोबत चर्चासत्र घेण्यात आले. डॅशबोर्ड द्वारे प्रकल्पांचा जलद व विना अडथळा परिणामकारक पध्दत अवलंबली जात आहे. शाश्वत शहर यंत्रणा व शहराची ओळख: संस्था नागरीक यांचा सहभाग, प्रकल्पाची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचविणे, नागरीकांचा सहभाग वाढविणे, माहिती प्रसारण, माहितीची देवाणघेवाण,चर्चासत्र अद्याप सुरुवात केलेली नाही. तेही कामकाज सुरू केले जाणार आहे.
काय आहे सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस ?
सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसचे व्यवस्थापन एक सल्लागार संस्था पॅलेडियम द्वारे केले जाते. पॅलॅडियम एक जागतिक प्रभावी फर्म आहे, जी सामाजिक प्रगती आणि व्यावसायिक वाढीशी दुवा साधत आहे. गेल्या ५०वर्षांपासून, पॅलॅडियम आमच्या ग्राहकांना रणनीती तयार करून, भागीदारी साकारण्याद्वारे आणि कायमस्वरुपी सामाजिक आणि आर्थिक परिणाम असलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करून. जागतिक पातळीवर शहरांना एकमेकांशी जोडण्यास मदत करत आहे. साध्या भाषेत सांगायचे तर पॅलेडियम ही संस्था सकारात्मक व प्रभावशाली काम करणारी मान्यताप्राप्त संस्था आहे. पॅलॅडियम कंपनी महापालिका, सरकार, गुंतवणूकदार, समाज आणि नागरी समाजासाठी कार्य करते. ९० पेक्षा अधिक देशांमध्ये जागतिक नेटवर्कचे कार्य चालू असताना पॅलॅडियम जगाला एक चांगले स्थान बनविण्याच्या व्यवसायात आहे.