निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (वित्त व लेखा) सहसंचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालिकेत जितेंद्र कोळंबे यांची वर्णी लागली आहे. वित्त विभागाच्या अवर सचिव माधवी गांधी यांनी नुकताच हा बदलीचा आदेश पारित केला आहे.
नाशिक महापालिकेतून 1 जुलै 2016 ला राजेश लांडे यांची पिंपरी-चिंचवड पालिकेत मुख्य लेखापालपदी बदली झाली होती. त्यांच्या 26 महिन्यांच्या कालावधीत लांडे यांनी पालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. आर्थिक वर्षे 31 मार्चनंतर बिले स्वीकरण्याची पालिकेतील चुकीची प्रथा त्यांनी 2017 ला बंद पाडली. त्यामुळे पालिकेला आर्थिक शिस्त लागली. ही प्रथा या वर्षीही राबविली गेली. तसेच, विविध चुकीच्या कामांना त्यांनी लगाम लावला होता. नियमात बसत नसल्याने त्यांनी दिवाळीचा बोनसही नाकारला होता. पालिकेच्या विविध बँक खात्यामध्ये पडून असलेली रक्कम जास्त व्याज दराने अल्पमुदत ठेवरूपात ठेवून त्यांने पालिकेच्या उत्पन्नात भर घातली होती. त्यामुळे त्याचा पालिका पदाधिकारी व अधिकार्यांनी सत्कारही केला होता.