निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे आज एका कुटुंबाला आपल्याला जीवाला मुकाव लागल असत, मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून पिंपरी शहरातील सहाने कुटुंब एका मोठ्या दुर्घटनेतुन बचावल आहे. वीजतारांमधून अचानक पुरवठा सुरू झाल्याने त्यांना जोराचा झटका बसला, आणि सहाने कुटुंब अक्षरसह मोठ्या दुर्घटनेतुन बचावल आहे. शनिवारी ही घटना जुनी सांगवी येथे घडली.
पिंपरी शहरातील जुन्या सांगवी परिसरात राहणाऱ्या उज्वला सहाने ह्या नेहमी प्रमाणे उठल्या, नंतर बाहेर पडण्यासाठी घराच्या समोरील त्यांच्या मेनगेट ऊघडन्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना गेट उघड़तांना त्यांना जोराचा शॉक बसला, नेमका काय प्रकार झाला हे बघन्यासाठी त्यांनी गेट ला टेस्टर लावला असता त्यातून अश्या पद्धतीने ठिंनग्या उड़त असल्याने लोखंडी गेट मध्ये विजेचा प्रवाह उतरल्याच् त्यांच्या लक्षात आल, आणि त्यांनी दक्षता घेत स्वत:सह आपल्या कुटुंबाला ह्या गेट पासून दूर ठेवल.
नंतर त्यांनी महावितरणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वेळेत मदत मिळाली नाही आणि अखेर त्यांनी हां धोकादायक प्रकार सोशल मिडीयावर व्हारईल करत घडल्या प्रकाराची कैफीयत सोशल मीडियावर लोकमत न्यूज १८ च्या प्रतिनिधींच्या समोर मांडली. सहाणे ह्यांच्या म्हणण्यानुसार गेट ला लागून असलेली डीपी अनेक दिवसांपासून ना दुरुस्त आहे त्या बाबद महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने भविष्यात अपघात घडल्यास त्यासाठी महावितरण जबाबदार असेल, असे सहाने कुटुंबीयांनी सांगितले.