निर्भीडसत्ता न्यूज –
दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्यांना नागरीकांना सामोरे जावे लागते. मानवी चुकीमुळे घडणारे अपघात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात वेगवेगळ्या आव्हानांना नागरीकांना सामोरे जावे लागते. या आव्हानांचा सामना करताना अंमलात आणावयाच्या उपाय योजनांची माहिती नागरीकांना व्हावी लागते. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन उत्तम पाटील, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, हेमंत निकम, तहसिलदार महसूल प्रल्हाद हिरामण, तहसिलदार श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे महानगरपालिका अग्निशमन विभाग व नागरी सरंक्षण दल पुणे या विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. ७५० ते ८०० नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देवून आपत्ती व्यवस्थापन साहित्याबाबत माहिती घेतली.
सध्या आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान चालू असून जिल्ह्यामध्ये वेगवेगळया कंपनी, शाळा, शासकीय कार्यालये यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी केले.