पुणे |
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये ग्रंथालय विभागातर्फे
‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ‘ (बौद्धिक स्वामित्व हक्क ) या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते . टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या इन्फर्मेशन रिसोर्स विभागाचे प्रमुख किशोर इंगळे यांनी मार्गदर्शन केले . प्राचार्य अनिता फ्रान्झ ,ग्रंथपाल चंदा सुपेकर,विद्यार्थी ,प्राध्यापक वर्ग उपस्थित होता . बौद्धिक स्वामित्व हक्क ,कायदे ,पेटंट ,कॉपीराईट ,ट्रेडमार्क या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले