पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदाचा 2 वर्षांचा कालावधी संपल्याने भाजपचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य 29 फेबु्रवारीला निवृत्त होत आहेत.
त्यात स्थायी समितीचे सभापती भाजपचे विलास मडिगेरी, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, करूणा चिंचवडे, नम्रता लोंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड गुरूवारी (दि.20) होणार्या पालिका सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. जर, भाजपने वर्षभराचा कालावधी केल्यास पक्षाचे उर्वरित 4 व अपक्ष 1 असे 5 सदस्य बाहेर पडू शकतात. त्यामुळे भाजपचे 10 व अपक्ष 1 असे एकूण 11 जण समितीतून बाहेर पडतील.