डिंकाचे लाडू आरोग्यासाठी जबरदस्त गुणकारी असतात. शुद्ध साजूक तुपास बनवलेले हे सहज पचतात. दररोज नाश्त्यामध्ये एक डिंकाचा लाडू आवर्जून खा. यामुळे कमजोरी दूर होईल आणि शरीराला उर्जा मिळेल. डिंकाचे लाडू खाल्ल्याने कोणते फायदे होतात आणि ते बनविण्याची कृती आपण जाणून घेणार आहोत.
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात तूप टाकून गरम करा, त्यामध्ये डिंक तळून घ्या. डिंक मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर यामध्ये पीठीसाखर टाका. तसेच डिंक, वेलची पवडर अणि तूप टाकून लाडू बनवा. हे लाडू एयर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे ते बरेच दिवस ताजे राहतील.
- हे आहेत फायदे
- जर महिलांनी गरोदरपणात डिंकाचे लाडू खाल्ले तर कमजोरी दूर होईल.
- गरोदर महिलां ताकद मिळते. आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते.
- कमी वजन असलेल्या महिनांनी दूधासोबत डिंकाचे लाडू खावेत. यामुळे वजन वाढेल.
- वजन जास्त असल्यास दिवसात एक लाडू खा.
- याच्या सेवनाने महिलांची अंगावरून पांढरे जाण्याची समस्या दूर होते.