पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घसरत आहे. रविवारी (दि.11) केवळ 352 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली. तर, 383 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 83 हजार 785 झाली आहे. सक्रिय 2 हजार 655 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 196 रूग्ण दाखल आहेत. दोन हजार 931 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. दोन हजार 881 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, अद्याप 1 हजार 37 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 62 हजार 120 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 2 लाख 77 हजार 298 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधित 383 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 78 हजार 149 वर पोहचली आहे. उपचारादरम्यान, पिंपळे सौदागर, थेरगाव, काळेवाडी, आकुर्डी, नेहरूनगर, मोरवाडी, रहाटणी, निगडी, चिंचवड, भोसरी, चिखली येथील रहिवाशी असलेले 15 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 432 रूग्ण मरण पावले आहेत. तर, शहराबाहेरील 13 जणांचा मृत्यू झाला असून, ती संख्या 559 वर पोहचली आहे.