चंदीगड गर्ल हरनाझ संधूनं विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच ‘मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021’ किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाझने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70 वं वर्ष आहे.
हरनाझ भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत ‘Miss Universer 2021’ किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाझने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता.
कोण आहे हरनाझ संधू?
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती पेशाने मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.