मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
राज्यात सत्तातर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते कोण होणार याबद्दल मोठी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आजपर्यंत 4 वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच अजित पवार हे विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत.
काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. त्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी अजितदादांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी अजित पवारांच्या खांद्यावर असणार आहे.
अजित पवारांची राजकीय कारकीर्द
- 1991 मध्ये अजित पवार हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले
- त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांची विधानसभेत एन्ट्री
- ते बारामती मतदारसंघातून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत
- यादरम्यान त्यांनी ऊर्जामंत्री, अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली आहेत
- विरोधीपक्षातही प्रदीर्घ काळ काम केल्याचा त्यांना अनुभव आहे
- प्रशानसनाची नस् न नस् त्यांना माहितीये
- अधिकाऱ्यांवर वचक असणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं
- त्यांनी आतापर्यंत 4 वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे