पुणे | निर्भीडसत्ता न्यूज
नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचे कारकीर्द माहिती होण्यासाठी आणि प्रेरणा मिळावी यासाठी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य असे स्मारक शिल्प उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक निधी पुणे महापालिकेने उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी बाळासाहेबाची शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पुरंदर किल्ला हे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी हजारो शंभूप्रेमी पुरंदर किल्ल्यास भेट देतात. त्यामुळे त्या ठिकाणी भव्य असे स्मारक होणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेने सुभेदार तानाजी मालसुरे यांचे भव्य शिल्प महापालिका निधीतून सिंहगडावर उभारले आहे. त्याच धर्तीवर पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास पुणे महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर झाला आहे. मात्र, त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. स्मारकासाठी महापालिकेने तातडीने 3 कोटीचा निधी मंजूर करावा. तसे, आदेश महापालिका आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.