पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव करण्यात आला. मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या ई लिलावामध्ये 48 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 17 ठिकाणच्या भंगाराचा लिलाव करण्यात आला असून त्यामधून पालिकेला साडेपाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेच्या विविध विभागातील निरुपयोगी व भंगार साहित्याचा लिलाव केला जातो. यावर्षी पर्यावरण, वायसीएम रुग्णालय, मोशी कचरा डेपो, सेक्टर 23 याठिकाणच्या भंगाराचा लिलाव करण्यात आला. 18 ठिकाणी असलेलल्या सर्व भंगाराचे 3 कोटी 80 लाख 82 हजार रुपये मध्यवर्ती भांडार विभागाने जाहीर केले होते. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ई लिलावामध्ये 48 जणांनी सहभाग घेतला. तसेच सहभागी असलेल्या प्रत्येकाला साहित्य पाहण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी दिला होता. 48 पैकी तब्बल 20 जणांनी ई लिलावामध्ये सर्व लॉटची रक्कम बयाणा म्हणून भरली होती.
भंगार साहित्याची बोली लावण्यात आली. त्यामध्ये सर्व 17 ठिकाणच्या भंगार साहित्याचे 5 कोटी 62 लाख 16 हजार रुपये उत्पन्न मिळाले. जाहीर केलेल्या किंमतीपेक्षा तब्बल १ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपये महापालिका प्रशासनाला जास्त मिळाले आहेत.