पुणे | निर्भीड सत्ता न्यूज
किंग खानच्या पठाण चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले आहे. पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहेत. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग दलाने राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात होती. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.