भामा आसखेड जॅकेवल कामास मंजुरी दिल्याने न्यायालयात जाण्याचा इशारा
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
वादग्रस्त ठरलेली भामा आसखेड धरण जॅकवेलची निविदेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिल्याने दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनातील आयुक्त दालनाबाहेर सोमवारी (दि.3) आंदोलन केले. आंदोलनकर्त्यानी आयुक्त, भाजप आमदार व भाजप सरकार चोर है…च्या घोषणांनी महापालिका भवन दणादून सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक शाम लांडे, राहुल भोसले, पंकज भालेराव, अतुल शितोळे, माया बारणे, विक्रांत लांडे, राजू बनसोडे, विनायक रणसुभे, फजल शेख, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेल उभारणे आणि इतर आवश्यक कामांच्या निविदेच्या 176 कोटी 42 लाख खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी 29 मार्चला स्थायी समितीची मान्यता दिली. या निविदेबाबत अनेक तक्रारी व आरोप असताना सुनावणी न घेताच आयुक्तांनी परस्पर मान्यता दिल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रसने आज आंदोलन केले. आयुक्त दालनासमोर आयुक्त व भाजप नेत्यांचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले. शिष्टमंडळाने आयुक्तांना निविदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
शहराध्यक्ष अजित अजित गव्हाणे म्हणाले की, या निविदेच्या माध्यमातून भाजपला पालिकेत तब्बल 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. निविदा प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविण्यात आली. ठेकेदाराने एका दिवसात तब्बल 27 कोटी रूपये कमी केले. निविदेला विरोध असल्याने पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले, त्याच दिवशी आयुक्तांनी या कामास परस्पर मंजुरी दिली. सर्वजण शोक व्यक्त करत असताना भाजप व प्रशासनाने स्वार्थासाठी ही निविदा मंजूर केली, असा आरोप त्यांनी केला. तक्रारीची दखल घेऊन सुनावणी न घेताच निविदेस मंजुरी दिल्याने त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशा इशारा शहराध्यक्ष गव्हाणे यांनी दिला.