पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यमुनानगर, निगडी येथील सद्गगुरू दत्त उद्यानात बांधण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व योगा केंद्राचे कै. प्रवीण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे असे नामकरण करण्यात आले. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नुकताच पार पडला.
ही इमारत बांधून दोन वर्षे झाले तरी, त्याचे उद्घाटन न झाल्याने त्याचा वापर नागरिकांना करता येत नव्हता. उद्घाटन करून इमारत नागरिकांसाठी खुली करण्याची वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्या केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच, माजी नगरसेवक रवींद्र खिलारे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिन काळभोर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.