पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड येथील त्यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, दादा कदम, गोरक्षनाथ दुबाले, समर्थ नाईकवाडे, चंद्रकांत पिंगट, अमित पासलकर, बबन काळे, मारुती कौदरे, श्रीकांत मोरे, अशोक साळुंखे, विश्वनाथ कदम, संघटनेचे सदस्य व कामगार आदी उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले की, स्व. अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी माथाडी आणि मापाडी कामगार यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा चालू केला. अनेक राजकीय नेत्यांकडे सरकार दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला. त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळून आज माथाडी संघटना ही एक बलाढ्य संघटना म्हणून नावारूपाला आले अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांच्या करीता केलेले कार्य एका दीपस्तंभ सारखे आहे. त्याचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.