निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २७) सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. १७) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
जलशुध्दीकरण केंद्राची तातडीने तांत्रिक दुरूस्तीचे काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी ज्या भागात सायंकाळी पाणी पुरवठा होतो, त्या भागांना गुरूवारी सकाळी पाणीपुरवठा होईल. त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.