निर्भीडसत्ता न्यूज –
मॉडेल वार्ड संभाजीनगर परिसरातील कचरा उचलला जात नाही, त्यामुळे रस्त्यावरच कचरा पडून आहे. वेळेवर कचरा उचलनारी गाडी न आल्यामुळे कचरा रासत्यावरच टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आल्याचे चित्र यावरून दिसते. मॉडेल वार्डात कचरा रस्त्यावर पडत आहे त्यामुळे येथिल संतप्त असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरीक देत आहेत.
मॉडेल वार्ड संभाजीनगर या परिसरातील नियमितपणे कचरा उचलला जात नाही. गेल्या अनेक दिवसापासून ही समस्या कायम आहे. घरोघरीचा कचरा उचलला जात नसल्याने प्रभागातील नागरिक दिसेल तिथे अस्ताव्यस्तपणे कचरा टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात कचरा कायम असल्याचे चित्र आहे.
– शहरातील रस्ते व परिसरातील स्वच्छतेचे योग्य नियोजन आरोग्य विभागाने करावे असे आयुक्त श्रावण हर्डीकर यानी महापालिका आयुक्त कक्षात शहरातील आरोग्य विषयक कामकाजाबबत आढावा बैठकीत सांगितले होते. त्यावर आयुक्त हर्डीकर काय कारवाही करणार असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत.