निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या झोपडपट्टी सर्व्हेच्या कामकाजाची पाहणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली. त्यावेळी सर्व नागरिकांनी झोपडपट्टी सर्व्हेक्षणासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पिंपळे गुरव येथील राजीव गांधीनगरमध्ये सर्वे सुरु असताना त्यांनी पाहणी केली. यावेळी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोले, नगरसेवत सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, उषा मुंढे, माधवी राजापुरे, सीमा चौघुले, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, उपअभियंता ए. बी. पाटील, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते. तसेच, झोपडपट्टी सर्व्हेक्षणाच्या कामकाजाबाबत कॅनबरी एनएक्सचे ओंकार गौरीधर यांनी माहिती दिली.