निर्भीडसत्ता न्यूज –
‘कमवा व शिका’ ही महाराष्ट्र राज्याची योजना तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांची’राष्ट्रीय क्षमता वृद्धी मिशन’ (NEEM) च्या माध्यमातून भारतभर तरुणांनाप्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी भारतातील सुमारे १६ हजार तरुणांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ‘ऑन जॉब’ ट्रेनिंगच्या माध्यमातून अनेक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्येपाठवून त्यांचे कौशल्य विकास करण्याचे काम युवा शक्ती फाऊडेशनने केले आहे. त्याचे श्रेय युवा शक्ती फाऊडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना जाते. हे सर्व उपक्रमराबविताना विध्यार्थींकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्किल इंडिया मिशन’ साठी फाऊंडेशन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत युवा शक्ती फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पवार यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
युवा शक्ती फाऊंडेशनच्या ‘स्किल डेव्हलपमेंट’ च्या आढावा बैठकीचे पिंपरी येथे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी पवार बोलत होते. युवा शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष एकनाथ पवार, संचालक विक्रमादित्य पवार,सतिश पवार, टाटा मोटर्सचे माजी मनुष्यबळ विकास अधिकारी व कायदेशीर सल्लागार अॅड. आर. एन. निर्मल, संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व देशातीलवेगवेगळ्या विभागातील कौशल्य विकासाचे काम सांभाळणारे विभाग प्रमुख या वेळी उपस्थित होते.
युवा शक्ती फाऊंडेशनच्या ‘स्किल डेव्हलपमेंट’ गेल्या अकरा वर्षापासून सांस्कृतिक मनुष्यबळ सेवा, ट्रेनिंग तसेच प्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. प्रामुख्याने ग्रामीण शहरी भागातीलतरुण वर्गाला रोजगार कौशल्य प्रशिक्षण व नोकरी मार्गदर्शन प्रदान करणे व व्यावसायिक विकासावर प्रशिक्षण देणे या माध्यमातून काम करत आहे. संस्थेच्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशातएकूण १२ शाखांच्या माध्यमातून रोजगार व कौशल्य विकासावर आधारित उपक्रम चालू आहेत.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक विक्रमादित्य पवार आणि सतिश पवार यांनी कौशल्य विकासाच्या कामात गती आणण्यासाठी विविध मुद्यांचा आढावाघेऊन योजना परिणामाकरित्या राबवण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिका बघेल यांनी केले. प्रदीप कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या पदाधीकाऱ्यांनी परिश्रम घेतले.