निर्भीडसत्ता न्यूज –
मराठवाडा जनविकास संघ संचलीत मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रभक्ती संस्करण प्रदर्शन आयोजित करून 26 जुलै हा 18 वा कारगील विजय दिन साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शाहराचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलेजा मोरे, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सागर अंघोळकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, अश्विनिताई जाधव, माई ढोरे, बांधकाम व्यवसायीक भैरुजी मंडले, प्रवीण पाटील, उद्योजक सुनील औटी, श्रीनिवास बडे, सीमा चौगुले, अदिती निकम, संतोष कांबळे, राष्ट्रभक्ती संस्करण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन चिलवंत, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे सर, दत्तात्रय धोंडगे, मारुती बानेवार, दीपक जाधव ,नामदेव पवार, शशिकांत दुधारे, संजय सूर्यवंशी, शिवकुमार बायस, संजयजी कीर्तने, कृष्णाजी खडसे,अमोल लोंढे, रंजीत घुमरे, संतोष खवळे, संतोष जाधव, सुनील आवटी,संजय घुमरे पाटील तसेच भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ,भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा जेष्ठ नागरिक संघ, मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड शहर कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सभासद आदी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पिंपरी चिंचवड शाहराचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते देशभक्ती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपमहापौर शैलेजा मोरे यांनी अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
मराठवाड्याच्या भूमिपुत्रांनी आपल्या मात्रभूमिसाठी लढणाऱ्या शूरवीर सैनिकांना मानवंदना देऊन आपल्या देशाच्या जवानांचा सन्मान केला. कारगील युद्धातील ५४८ देशासाठी शहीद झालेल्या सैनिकाची आठवण राहावी याच भावनेतून मराठवाडा जनविकास संघ संचलीत मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शैलेजा मोरे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड मधील देशभक्तीपर प्रदर्शनाचा पहिलाच उपक्रम पहायला मिळाला याचा मला मनापासून आनंद वाटतो. मराठवाड्याचे भूमिपुत्र आपल्या देशासाठी लढलेल्या सैनिकांची आठवण सदैव मनात ठेवतात तसेच १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने साजरा करावा आणि २६ जुलै कारगील दिनाच्या दिवशी घोषणा करावी.
तसेच कारगील विजय दिन मराठवाडा जनविकास संघाने साजरा करून पिंपरी चिंचवड मधील सामाजिक संघटनापुढे एक देशभक्तीचा आदर्श ठेवला आहे. देशभक्तीचे स्फुल्लिंग मनामनात पेटवणारा उपक्रम म्हणून खरच गौरवपूर्ण आहे असे मत उपमहापौर मोरे यांनी व्यक्त केले.
भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे प्रकाश बंडेवार म्हणाले की, मराठवाडा जनविकास संघ मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वर्षभर सामाजिक बांधिलकीतून कार्यक्रम राबविले जातात. त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे.