निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी लावल्या जाणा-या अनधिकृत होर्डीग्जवरून स्थायी समितीने बुधवारी (दि. २६) आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिका-यांवर ताशेरे ओढले. अनधिकृतपणे झळकणा-या जाहिराती व होर्डिग्जवर कारवाई करून महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना स्थायी समितीने दिल्या आहेत.
सीमा सावळे स्थायी समिती सभेच्या अध्यक्षानी होत्या. शहरातील अनधिकृत जाहिरात फलक व होर्डिंग्जच्या विषयावर स्थायी समितीच्या सदस्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा विभाग असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतो. शहरात १८४९ अधिकृत होर्डिंग्ज असूनही पालिकेच्या मालकिचे फक्त २७ होर्डिग्ज आहेत. अनेक होर्डिग्ज पालिकेच्या जागेत आहेत. अधिका-यांकडून परवानगी देताना नियम पाळले जात नाहीत. अधिका-यांना विचारलेली माहिती न देता आल्याने आकाशचिन्ह व परवाना विभागाशी संबधित अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे आणि सहायक आयुक्त योगेश कडूस यांनाही स्थायी समितीने रडारवर घेतले.